दुष्काळ मुक्तीसाठी ‘जलसिंचन’ उत्तम पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:35 IST2019-05-11T22:34:54+5:302019-05-11T22:35:16+5:30

नाम फाऊंडेशनने घेतला पुढाकार । प्रशासनासह ग्रामस्थांचे श्रमदान ठरणार मोलाचे

'Best irrigation' option for drought relief! | दुष्काळ मुक्तीसाठी ‘जलसिंचन’ उत्तम पर्याय!

दुष्काळ मुक्तीसाठी ‘जलसिंचन’ उत्तम पर्याय!

संडे हटके बातमी
देवेंद्र पाठक ।
लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे : सतत पडणारा दुष्काळ, नापिकी अशा द्विदा मनस्थितीत बळीराजा वावरत असताना त्याला उत्तम पर्याय हा जलसिंचनाचा ठरणार आहे़ हा धागा पकडून नाम फाऊंडेशनची निर्मिती झाली़ या संघटनेच्या माध्यमातून होणारे काम आता धुळे तालुक्यात देखील सुरु झाले आहे़ त्याचा काही अंशी का असेना शेती सिंचनाखाली येत असल्याने दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या दाहकतेत फरक पडत आहे़  
शेतकºयांच्या होणाºया आत्महत्या, त्यांना मिळणारी तुटपुंजी मदत लक्षात घेता सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी संपन्न होऊ शकतो असा विचार पुढे आला़ आॅगस्ट २०१५ च्या दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लँकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते. परंतु, केवळ काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता शेतकºयांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठी या संस्थेची कल्पना पुढे आली. या कल्पनेचे रुपांतर ‘नाम’ फाऊंडेशन या संस्थेमध्ये झाले. 
‘नाम’ फाऊंडेशनचे कार्य संपुर्ण राज्यात सुरु झाले असताना ते अधिक गतीने होण्यासाठी जिल्हा समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली़ त्यात अनेकांनी सहभाग नोंदवत असताना आपले काम सांभाळून केवळ सामाजिक कामात सक्रीय झाले़ धुळे जिल्ह्याचे समन्वयक म्हणून प्रदीप पानपाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली़ त्यांच्याकडून ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली जात आहे़ 
सिंचन कामांसोबत आरोग्य सेवेसाठी सक्रीय
‘नाम’ फाऊंडेशनचे समन्वयक म्हणून प्रदीप पानपाटील हे काम करत असलेतरी यापुर्वीपासून ते आरोग्य सेवेत सक्रीय आहे़ सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सेवा कशी उपलब्ध होईल, याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष राहिला आहे़ अगदी निरपेक्ष भावनेने, त्यांचे कार्य सुरु आहे़
दुष्काळसदृश्य परिस्थिती हटविण्यासाठी प्रयत्न
धुळे तालुक्यातील लामकानी येथे ४ ते ५ किमी इतक्या अंतरात नाल्याचे खोलीकरण, पाझर तलावाचे काम करण्यात आले़ तसेच काम धुळे तालुक्यातील मांडळ येथेही १० किमी अंतरात काम सुरु आहे़ त्याचा लाभ गावकºयांना होणार असल्याने त्यांच्याकडून श्रमदान होत आहे़ प्रशासनाची देखील मदत मिळत आहे़ पाझर तलाव, नाला खोलीकरण असे काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून पोकलॅण्ड मशिन उपलब्ध करुन दिले जात आहे़ यासाठी जे काही डिझेल लागत आहे ते प्रशासनाकडून मिळत आहे़ संघटनेसह गावकºयांचे मिळत असलेल्या श्रमदानातून खूप मोठ्या कामांचा पल्ला गाठला जात आहे़ दुष्काळ हटविण्यासाठी हे प्रगतीचे पाऊल आहे़ 

Web Title: 'Best irrigation' option for drought relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे