कोंबड्या मारण्याची मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:02 IST2020-03-17T22:01:33+5:302020-03-17T22:02:01+5:30

पोल्ट्री व्यवसायाला फटका : प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी

Begging permission to kill chickens | कोंबड्या मारण्याची मागितली परवानगी

dhulle

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाचा सर्वाधिक फटका कुक्कुट पालन व्यवसायाला बसला आहे़ चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते अशी अफवा पसरल्यामुळे
हा व्यवसाय ठप्प झाला असून, आम्हाला आमच्या कोंबड्या मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे़
धुळे जिल्हा पोेल्ट्री फार्म असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व पोल्ट्री व्यावसायिकांनी मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिले़ जिल्ह्यातील पोल्ट्री फार्ममध्ये सध्या जिवंत पक्षी आहेत़ त्यांना बाजारात मागणी नाही़ त्यामुळे पशुसंवर्धन विभाग आणि महसूल विभागाने पक्षांची नोंद घेवून सर्व पक्षी मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कुक्कुट पालन करणाºया शेतकऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी केली आहे़ तसेच व्यवसाय ठप्प झाल्यामुळे बँकेचे कर्ज फेडणे तसेच उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे़ त्यामुळे प्रति पक्षी शंभर रुपये भरपाई मिळावी, कर्जाचे हप्ते सहा महिने पुढे ढकलावे, अशी मागणी निवेदनात केली आहे़
४कोरोनाबाबात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केवळ एकाच व्यक्तीने निवेदन देण्यासाठी यावे अशा सूचना होत्या़ तरी देखील सर्वजण निवेदन देण्यासाठी गेल्याने निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यात आणि पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये शाब्दीक वाद झाला़ त्यामुळे वातावरण तापले होते़

Web Title: Begging permission to kill chickens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे