एका मोबाईल ॲपवर मिळणार बेडची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST2021-04-04T04:37:19+5:302021-04-04T04:37:19+5:30

शहरातील खासगी रुग्णालयात उपलब्ध सामान्य बेड, आॅक्सिजन बेड, व्हेटिंलेटर बेडची माहिती संकलित करून ती नागरिकांना देण्यासाठी मनपाकडून स्वतंत्र यंंत्रणा ...

Bed information can be found on a mobile app | एका मोबाईल ॲपवर मिळणार बेडची माहिती

एका मोबाईल ॲपवर मिळणार बेडची माहिती

शहरातील खासगी रुग्णालयात उपलब्ध सामान्य बेड, आॅक्सिजन बेड, व्हेटिंलेटर बेडची माहिती संकलित करून ती नागरिकांना देण्यासाठी मनपाकडून स्वतंत्र यंंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. शहरात काेराेना रुग्णांची संख्या वाढते आहे. रुग्णालयात उपलब्ध बेडबाबत नागरिकांना माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण घरीच विलगीकरण करून उपचार घेत आहे. संबंधितांना याबाबतची माहिती उपलब्ध व्हावी आणि रुग्णांवर वेळेेत उपचार व्हावे यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे काेविड रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेडची माहिती देणारा फलक विविध भागात लावण्यात येत आहे याविषयीची माहिती साेशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच खासगी संस्थेच्या मदतीने स्वतंत्र ॲप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात हे ॲप कार्यान्वित करण्याबाबत मनपा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच कामकाजाबाबत अधिकाऱ्यांकडून सबंधितांना सूचना देण्यात आल्या. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेतर्फे कार्यवाही केली जात आहे.

Web Title: Bed information can be found on a mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.