महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:44+5:302021-02-06T05:07:44+5:30
दोन दुचाकींची धडक धुळे : शहरातील महापालिकेजवळ असलेल्या मुख्य पोस्ट कार्यालयासमोर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. यात संजय जगन्नाथ ...

महिलेस मारहाण
दोन दुचाकींची धडक
धुळे : शहरातील महापालिकेजवळ असलेल्या मुख्य पोस्ट कार्यालयासमोर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. यात संजय जगन्नाथ चौधरी (५०) यांना दुखापत झाली. अपघाताची ही घटना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या संजय चौधरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
अल्पवयीन मुलीचे अपहरण
धुळे : एका अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना शिरपूर शहरात १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. बराच वेळ होऊनही ती घरी न आल्यामुळे तिच्या घरच्या मंडळींनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, ती मिळून न आल्यामुळे तिला कोणीतरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत ३ फेब्रुवारी रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.