पूर्ववैमनस्यातून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST2021-05-11T04:38:02+5:302021-05-11T04:38:02+5:30
दुचाकी लांबविली धुळे : नकाणे रोडवरील प्रमोदनगर येथून एमएच १८ बीएफ ९११७ क्रमांकाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोट्याने ...

पूर्ववैमनस्यातून मारहाण
दुचाकी लांबविली
धुळे : नकाणे रोडवरील प्रमोदनगर येथून एमएच १८ बीएफ ९११७ क्रमांकाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोट्याने लांबविली. चोरीची ही घटना ११ एप्रिल रोजी रात्री १० ते १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सर्वत्र शोधाशोध करूनही दुचाकी न मिळाल्यामुळे डिगंबर भिका चौधरी यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जाब विचारल्याने मारहाण
धुळे : मारहाण केल्याची खोटी तक्रार का केलीस असा जाब विचारणाऱ्या महिलेसह तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना साक्री तालुक्यातील ढोलीपाडा शिवारातील शेताच्या बांधावर रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी प्रकाश रावसाहेब क्षीरसागर याने साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, दिलीप सखाराम क्षीरसागर, योगेश दिलीप क्षीरसागर, कमलेश दिलीप क्षीरसागर, मंगलाबाई दिलीप क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.