प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकाला दांडक्याने मारहाण; शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील घटना 

By देवेंद्र पाठक | Updated: September 9, 2023 17:32 IST2023-09-09T17:32:09+5:302023-09-09T17:32:31+5:30

प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.

Beating one with a stick on suspicion of having an affair Incident in Shindkheda taluk | प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकाला दांडक्याने मारहाण; शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील घटना 

प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकाला दांडक्याने मारहाण; शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील घटना 

धुळे: प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील वर्षी गावात ४ जून रोजी दुपारी ४ वाजता घडली. यात दिनेश रमेश माळी (वय ३९) हा तरुण गंभीर जखमी झाला. नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची शुक्रवारी नोंद करण्यात आली. बाजीरावनगर, वरवाडे, ता. शिरपूर येथील दिनेश रमेश माळी (वय ३९, रा. माळीवाडा, वर्षी ता. शिंदखेडा) या जखमी झालेल्या तरुणाने फिर्याद दाखल केली. 

त्यानुसार पीडित मुलगी आणि या तरुणात प्रेमसंंबंध आहेत असा संशय घेऊन तरुणाशी वाद घालण्यात आला. जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ करत काठीने मारहाण करण्यात आली. दिनेश हा गावातून त्याच्या मित्राकडे मोटारसायकलीने जात असताना त्याला अडविण्यात आले होते. काठीने मारहाण केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दिनेश माळी याने नरडाणा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने तीन जणांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास नरडाणा पोलिस करत आहेत.

Web Title: Beating one with a stick on suspicion of having an affair Incident in Shindkheda taluk