‘बल्हाणे’ होत आहे ‘ग्रीन व्हीलेज’; २२५ वृक्षांच्या लागवडीने सुंदरतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:18 IST2019-06-04T22:17:30+5:302019-06-04T22:18:17+5:30

पाच व्यक्तींनी राबविला उपक्रम : गावातील महिलांसह लहानमुलांनी दिला सहभाग; भवानी गडावर वृक्ष लागवड करण्याचा मानस

 'Balhane' is happening 'Green Village'; Covering 225 trees with beautiful flowers | ‘बल्हाणे’ होत आहे ‘ग्रीन व्हीलेज’; २२५ वृक्षांच्या लागवडीने सुंदरतेत भर

dhule

पिंपळनेर : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोष वाक्यानुसार साक्री तालुक्यातील बल्हाणे येथील पाच व्यक्तींनी एकत्र येत गावात २२५ वृक्षांची लागवड केल्याने आज गावाच्या सुंदरतेत भर पडल्याचे वास्तवात दिसत आहे. यामुळे बल्हाणे ‘ग्रीन व्हीलेज’ होत आहे.
समाजासह गावाचे देणे लागतो ही मनाशी इच्छा बाळगत सामाजिक कार्यातून गावासाठी कार्यकरण्याची आवड ठेवत पाच व्यक्ती एकत्र येऊन वृक्ष लागवडीचा ध्यास घेत २२५ वृक्षांची लागवड करुन जगवतात. आज ही वृक्ष १२ ते १५ फुट उंच अशी बहरलेली हिरवीगार दिसत आहे.
गावासाठी काम करायचे असल्याने राजकारण करायच नाही. फक्त सेवा व सामाजिक काम करायचे आहे, असे पाच व्यक्ती एकत्र येऊन एकविरा सेवाभावी संस्थेची स्थापना करुन बल्हाणे गावात काम करीत आहेत. स्वत: स्वखर्चातून काम करीत असताना उष्णतेची तीव्रता, बेसुमार वृक्ष तोड होत असता याचा परिणाम पर्जन्यासह इतर बाबींवर देखील हा परिणाम पहावयास मिळत आहे. गावात वृक्ष लागवडीतून फुलांच्या पाकळी इतका राष्ट्रीय कार्यास हातभार लावण्याचा ध्यास घेतला आहे.
गावात एकीही झाड नव्हते. यासाठी गावात अंगणात वृक्ष लावण्याचा ध्यास संस्थेने घेतला. २२५ वृक्षांची लागवड केली आहे. यात सप्तपर्णी, बदाम, लिंब, अशोका यासह इतर जातींचे वृक्ष लावले आहे. झाडे लावण्यासाठी संस्थेने ग्रामस्थांची येथे बैठक बोलविली. झाडे व खड्डे संस्थेने खोदून दिले. स्थानिक नागरिकांनी फक्त झाडाला पाणी द्यावे यासह या मोहिमेत महिलांसह लहान मुलांचे मोठे योगदान लाभले आहे, असे संस्था सांगते. लागवड केलेल्या वृक्षांना ट्री गार्ड लावले आहे. यामुळे १ जून २०१७ रोजी हे वृक्ष लावले होते. आज या वृक्षांची दोन वर्षात १२ ते १५ फुट उंची होवून छान बहरलेली पहावयास मिळतात. गावाच्या सुंदरतेत भर पडली असून यामुळे वृक्षांचे महत्त्व दिसून येत आहे. या वृक्षांच्या छायेत बालक खेळतांना दितसता. या वृक्षांवर काही बालकांनी पक्षांना पाण्याची भांडी ठेवलेली दिसतात. यापुढेही एकविरा सेवाभावी संस्था भवानी गडावर वृक्ष लागवड करणार आहे. संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य, अमरधाम व जि.प. शाळेला जाळी कंपाऊंड, सावित्रीबाई फुले शाळा सामोडेला एलसीडी सेट भेट, ग्रा.पं.ला डोली भेट दिली. संस्थेच्या माध्यमातून समर्पण सेवेतू मयताला लाकूड, रॉकेल, मीठ देण्यात येते. संस्थेला पाच वर्ष पूर्ण होत आहे. या संस्थेत सुनील भामरे, देविदास कुवर, प्रविण पाटील, शरद बिरारीस, चंद्रकांत अहिरराव हे काम करीत आहेत.

Web Title:  'Balhane' is happening 'Green Village'; Covering 225 trees with beautiful flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे