आयुष काढा वितरणाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 21:55 IST2020-07-12T21:54:46+5:302020-07-12T21:55:00+5:30

संडे अँकर । शिरपूर कोरोनावर मात करणारा तालुका व्हावा, मान्यवरांची अपेक्षा

AYUSH Kadha distribution begins | आयुष काढा वितरणाला सुरूवात

आयुष काढा वितरणाला सुरूवात


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना त्यास अटकाव करण्यासाठी लोकसहभागातून आयुष काढा वितरणाला सुरूवात झाली़
१० रोजी शहरातील पाटील वाड्यातील मारूती मंदिर चौकात लोकसहभागातून आयुष काढा वाटपाला सुरूवात झाली़ यावेळी प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील, नगरसेवक हेमंत पाटील, नगरसेविका मोनाली शेटे, रोहित शेटे, डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉ़सचिन पाटील, डॉ़लोकेश वैद्य, डॉ़सूर्यकांत पाटील, डॉ़विशाल पाटील, डॉ़योगेश जाधव, डॉ़धनजंय पंचभाई, डॉ़अनिल पाटील, अ‍ॅड.सुहास वैद्य, मुस्तुफा बोहरी (शब्बीर स्टोअर्सवाले), महेश जोशी, अशोक बाफना, राजू मारवाडी आदी उपस्थित होते़
अनेक ठिकाणी आयुष काढा घेतल्याने हमखास कोविड रोगावर फरक पडतो हे सर्वदूर अनुभव सिद्ध झाल्याने लोकवर्गणीतून आयुष मंत्रालयाने शिफारस केलेला आयुष काढा वाटप सुरु आहे. एका कुटुंबाला ७ दिवसासाठी साधारण ८० ते १०० रूपये खर्च अपेक्षित आहे़ याकामी डॉ़सारंग पंचभाई, डॉ़सूर्यकांत पाटील व इतर आयुर्वेद डॉक्टरांनी आयुष काढा बनवण्याची व मार्गदर्शन करण्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे़ तसेच मुस्तुफा बोहरी (शब्बीर स्टोअर्सवाले) यांनी ना नफा पण थोडा तोटा सहन करून औषध उपलब्ध करून देणार आहेत. बकुल अग्निहोत्री, सचिन सोनार, गौरव जोशी यांना वितरणाचे काम सोपविण्यात आले आहे़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपाचे हेमंत पाटील, रोहित शेटे, बंडू बडगुजर, हिरालाल कोळी, शरद पाटील, जगदिश शेटे, आक्का मराठे यांनी परिश्रम घेतलेत़

Web Title: AYUSH Kadha distribution begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.