शेतीच्या वादावरुन इसमावर कुऱ्हाडीने हल्ला; साक्री तालुक्यातील नागझिरी गावातील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: June 18, 2023 17:32 IST2023-06-18T17:31:54+5:302023-06-18T17:32:09+5:30
बालाजी पाेपट साबळे (वय ५५, रा. नागझिरी ता. साक्री) यांनी शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता फिर्याद दाखल केली.

शेतीच्या वादावरुन इसमावर कुऱ्हाडीने हल्ला; साक्री तालुक्यातील नागझिरी गावातील घटना
धुळे : शेतीचे बांध नांगरण्याचे विचारले असण्याच्या कारणावरुन कुऱ्हाडीच्या उलट्या दांडक्याने मारहाण करण्यात आली. हाताबुक्याने मारहाण करत जीवे ठार मारण्याची घटना साक्री तालुक्यातील नागझिरी गावात १० जून रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली होती. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा दाखल झाला.
बालाजी पाेपट साबळे (वय ५५, रा. नागझिरी ता. साक्री) यांनी शनिवारी दुपारी पावणे तीन वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शेतीचा बांध नांगरण्याचे विचारणा करण्यात आल्याने त्याचा राग आला. एकाने शिवीगाळ करत काठीने पाठीवर वार करण्यात आला. दुसऱ्याने कुऱ्हाडीचा उलटा दांडा हातात घेऊन पोटावर हल्ला चढविला. दोघांनी आपल्या चपलांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने हाताबुक्याने मारहाण केली. यात पाठीवर, तोंडावर, पाेटावर मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ केली.
या सगळ्यात गोंधळात एकाने माझ्या खिशातून बळजबरीने ५ हजार रुपये काढून घेतले. यानंतर मारेकऱ्यांनी जखमी अवस्थेत सोडून पळ काढला. ही घटना १० जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी अवस्थेत बालाजी पोपट साबळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक ठाकूर घटनेचा तपास करीत आहेत.