बोराडी आयुर्वेद कॉलेजला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:36+5:302021-08-22T04:38:36+5:30
बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालयातील कार्यरत प्रसूतीतंत्र व स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ़. राहुलकुमार कामडे यांना ...

बोराडी आयुर्वेद कॉलेजला पुरस्कार
बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालयातील कार्यरत प्रसूतीतंत्र व स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ़. राहुलकुमार कामडे यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आयुर्वेद संशोधक तसेच शल्यतंत्र विभागप्रमुख डॉ. ग़ुप्तेश्वर सोनवणे यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . आमदार लहू कानडे, शिक्षक आमदार भूषण पटवर्धन व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष जयंत आसगांवकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले़
पुरस्कार मिळाल्याबद्दल किविप्र संस्थेचे अध्यक्ष तथा जि. प. धुळे अध्यक्ष डॉ़. तुषार रंधे, संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशाताई रंधे, उपसरपंच बोराडी राहुल रंधे, नगरसेवक रोहीत रंधे, ग .स .बँकचे अध्यक्ष शशांक रंधे यांनी विशेष कौतुक केले. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़. राजेश गिरी व अध्यापक व कर्मचारी यांनी कौतुक केले़