पटेल ‘अभियांत्रिकी’ला स्वायत्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 22:48 IST2020-12-29T22:48:15+5:302020-12-29T22:48:32+5:30
ऑटोनाॅमस काॅलेज : विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता

पटेल ‘अभियांत्रिकी’ला स्वायत्तता
धुळे : नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाने आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून स्वायत्त महाविद्यालय (ऑटोनॉमस कॉलेज) म्हणून मान्यता मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.
महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे स्वायत्ततेसाठी प्रस्ताव सादर करून त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली होती. याच अनुषंगाने यूजीसीद्वारे गठीत स्वायत्तता समितीने ११ व १२ डिसेंबर रोजी महाविद्यालयास भेट दिली होती. या समितीने महाविद्यालयातील मूलभूत सोयीसुविधा तसेच महाविद्यालयाने संशोधन, विद्यापीठ परीक्षा व कॅम्पस प्लेसमेंट, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेऊन स्वायत्तता देण्यासाठी शिफारस केलेली होती.
स्वायत्ततेमुळे आता महाविद्यालयास नवनवीन संकल्पना राबविण्यास मदत होणार आहे. महाविद्यालयाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत झालेले सामंजस्य करार व त्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल करून विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविले जाईल. जर्मनी, जापनीज, फ्रेंच या सारख्या फॉरेन लँग्वेजेसला अधिकृतरित्या अभ्यासक्रमात सामाविष्ट करून घेतल्याने त्याचा फायदा कॅम्पस प्लेसमेंटसाठी मोठ्या प्रमाणात होईल.
स्वायत्तता मिळविण्याच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख मिल्केश जैन,जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन आदींनी परिश्रम घेतले.
शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अमरिश पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्री पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतन पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.