धुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचा-यांनी मुंडण करत वेधले प्रलंबित मागण्यांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:04 PM2018-06-27T17:04:42+5:302018-06-27T17:06:23+5:30

सेवानिवृत्त कर्मचा-यांचा संताप : ईपीएफओ संस्थेचा निषेध म्हणून प्रतिकात्मक पुतळयाचा दशक्रिया विधी

Attention to the pending demands of the retired employees of Dhule district | धुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचा-यांनी मुंडण करत वेधले प्रलंबित मागण्यांकडे लक्ष

धुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचा-यांनी मुंडण करत वेधले प्रलंबित मागण्यांकडे लक्ष

Next
ठळक मुद्देई.पी.एफ.ओ.ने जारी केलेली ३१ मे २०१७ रोजीची अंतरिम अ‍ॅडव्हायजरी मागे घेऊन सेवानिवृत्तांना पगाराच्या प्रमाणात उच्च पेन्शन बाबतचा पर्याय खुला करावा. तसेच २३ मार्च २०१७ च्या पत्रानुसार पेन्शन प्रश्नी कार्यवाही करावी. कमीत कमी ७,५०० मूळ पेन्शन देऊन पेन्शन महागाई भत्याशी निगडित करावी. ईपीएस-९५ पेन्शन योजनेंतर्गत जे सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनला पात्र ठरले नाहीत. पण विविध संस्थातून ज्यांनी पूर्ण सेवा दिली आहे. अशा कर्मचाºयांना सामावून घ्यावे.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देशभरातील विविध आस्थापनातील ईपीएस-९५ योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी बुधवारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करीत निषेध व्यक्त केला. सेवानिवृत्त्त कर्मचाºयांच्या या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, सेवानिवृत्तांच्या मागण्या सुटत नसल्याने सेवानिवृत्त ई.पी.एफ.ओ’ संस्थेचा निषेध करत या संस्थेचा दशक्रिया विधीही केला. 
ईपीएस-९५ निवृत्त कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्थेतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की ई.पी.एफ.ओ (एम्लॉईज प्राव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन, नवी दिल्ली) ही देशपातळीवरील मध्यवर्ती संस्था आहे. ही सेवानिवृत्तांसाठी ‘मातृसंस्था’ आहे.  परंतु सद्य:स्थितीत या संस्थेचे नियामक व नियंकत्रक यांनी पेन्शनर्स संबंधी एक प्रकारे अमानवी, निर्दयी, क्लेषकारक, अवहेलना उठवून लावण्याचे षडयंत्र उभे केले आहे. त्यामुळे हे आंदोलन करावे लागत आहे. 
या वेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत, एस.टी. महामंडळ संघटनेचे अध्यक्ष वाय. जी. राजपूत, वीज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम. जी. धिवरे, सीटू संघटनेचे कॉम्रेड एल. आर. राव, एस.टी महामंडळ सीटू संघटनेचे नेत पोपटराव चौधरी राष्टÑीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र एरडावकर, विजय येवलेकर, के. डी. गिरासे, वाय. पी. पवार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीसिंग जाधव आदी उपस्थित होते. 
आयुष्य सुखकर होणारे निर्णय घ्या!
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून ई.पी.एफ.ओ.ने वृद्ध व ज्येष्ठ नागरिक पेन्शनर्सना उर्वरित आयुष्य सुखकर कसे होईल? या दृष्टीने  निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा सेवानिवृत्त कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे. ३० ते ३५ वर्ष सेवानिवृत्त कर्मचाºयांनी सेवा दिली आहे. या बाबीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा; अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
याप्रसंगी ई.पी.एफ.ओ या संस्थेचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या संस्थेचा प्रतिकात्मक पुतळा करून त्याचा  दशक्रिया विधी करण्यात आला. या विधीनंतर सेवानिवृत्त महिला कर्मचाºयांनी या पुतळयाला जोडव्याने मारले. 

Web Title: Attention to the pending demands of the retired employees of Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.