पित्याकडून मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By देवेंद्र पाठक | Updated: July 15, 2024 21:27 IST2024-07-15T21:27:40+5:302024-07-15T21:27:58+5:30
कोंडाईबारी घाटातील घटना, साक्री पोलिसात पित्यावर गुन्हा

पित्याकडून मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
धुळे : नवीन कपडे घेऊन देतो, असे सांगून मोटारसायकलीने नेताना रस्त्यात निर्जनस्थळी नेऊन तरुण मुलीवर पित्यानेच अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना कोंडाईबारी घाटातील खोड्यादेव मंदिराजवळील जंगलात घडली. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून पित्यावर साक्री पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आला आहे.
यासंदर्भात साक्री तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय तरुणीला तिच्या वडिलांनी १० जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील दहिवेल येथे नवीन कपडे घेऊन देतो, असे सांगून मोटारसायकलीने नेले. मात्र, दहिवेलकडे न जाता कोंडाईबारी घाटातील खोड्यादेव मंदिराजवळील जंगलात तिला नेण्यात आले.
नराधम पित्याने स्वत:च्याच मुलीवर जबरदस्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घरी सांगितल्यानंतर उलट तरुणीच्या आजीला शिवीगाळ मारहाण केली. याप्रकरणी पीडित तरुणीने साक्री पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.