वर्तमानात रचनात्मक कार्यासाठी प्रयत्नशील असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:46 AM2020-01-13T11:46:31+5:302020-01-13T11:46:53+5:30

‘विद्यावर्धिनी’मध्ये व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा : उपप्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांचे प्रतिपादन

Attempts should be made for creative work at present | वर्तमानात रचनात्मक कार्यासाठी प्रयत्नशील असावे

वर्तमानात रचनात्मक कार्यासाठी प्रयत्नशील असावे

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे : भूतकाळात रमल्याने रचनात्मक कार्य सिद्धी करणे शक्य नाही. तेव्हा वर्तमानात वेळेचे समायोजन करून योग्य दिशेने मार्गक्रमण करणे अत्यंत निकडीचे असल्याचे मत पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. विलास चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ जळगाव व विद्यावर्धिनी सभेचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्यक्तीमत्व विकास कार्यशाळे’च्या उदघटनाप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. मोहन पावरा होते. अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी सभेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अनिल दामोदर होते.
स्वव्यक्तीमत्वाची ओळख करून या विकासाला चालना देण्यासाठी महाविद्यालयीन जीवन हीच योग्य वेळ असल्याचे सांगून प्रा.डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आंतरबाह्य बदल करण्यासाठी स्वत:मधील गुणवत्ता शोधून ती जोपासण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे सांगितले. तसेच वैगुण्यावर मात करून व्यक्तीमत्वाचा विकास करण्याचे आवाहन केले.
जन्माला येणारा प्रत्येक जीव हा एक व्यक्तीमत्व असतो. हे व्यक्तीमत्व विकसनशील स्वरूपाचे असते. याचा विकास करणे आपल्या हाती असल्याचे प्रा.डॉ. मोहन पावरा यांनी सांगितले. तर उपलब्ध संधीचा योग्य तो लाभ घेतला तर व्यक्तीमत्व विकास सहज साध्य होतो असे अनिल दामोदर यांनी सांगितले.
प्र. सतिष निकम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. विजय पालवे यांनी तर आभार डॉ. अभिषेक गायकवाड यांनी मानले.
कार्यशाळेला प्राचार्या डॉ. शुभदा रावळ -ठाकरे, प्रा.बी.डी.गणपाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. पी.ओ. व्यास उपस्थित होते.

Web Title: Attempts should be made for creative work at present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे