धुळे : मुकटीत एकावर कुऱ्हाडीने हल्ला धुळेतालुका पोलिसांत चारजणांवर गुन्हा
By अतुल जोशी | Updated: April 10, 2023 18:35 IST2023-04-10T18:35:29+5:302023-04-10T18:35:49+5:30
धुळे तालुक्यातील मुकटी येथील वाल्मीक माधवराव पाटील (वय ४३) यांनी फिर्याद दाखल केली.

धुळे : मुकटीत एकावर कुऱ्हाडीने हल्ला धुळेतालुका पोलिसांत चारजणांवर गुन्हा
धुळे : दुचाकीचा कट मारल्याच्या कारणावरून एकाला हाताबुक्क्यांसह कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आल्याची घटना धुळे तालुक्यातील मुकटी गावात शनिवारी घडली. याप्रकरणी रविवारी चारजणांविराेधात तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. धुळे तालुक्यातील मुकटी येथील वाल्मीक माधवराव पाटील (वय ४३) यांनी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, मोटारसायकलीचा कट लागल्याच्या कारणावरून मुलगा नितीन यास एकाने शिवीगाळ केली, दमदाटी केली. त्याचा जाब विचारत असताना त्याचा राग येऊन एकाने मारहाण केली. शिवीगाळ करीत कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यात नितीनसह कमलाबाई माधवराव पाटील यांना मारहाण झाल्याने गंभीर दुखापत झाली. वाल्मीक पाटील यांच्या डोक्यालाही दुखापत झाली.
ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. तातडीने जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रविवारी मध्यरात्री चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहेत.