प्रॉपर्टीच्या वादातून प्राणघातक हल्ला; बहिणीची दोघा भावांविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST2021-06-27T04:23:42+5:302021-06-27T04:23:42+5:30
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक अवधान शिवारात हॉटेल फौजी पंजाबी व हॉटेल राजेंद्र फौजी येथे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या ...

प्रॉपर्टीच्या वादातून प्राणघातक हल्ला; बहिणीची दोघा भावांविरुद्ध तक्रार
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक अवधान शिवारात हॉटेल फौजी पंजाबी व हॉटेल राजेंद्र फौजी येथे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास जसबिरसिंग ऊर्फ बंटी हरभजनसिंग पंजाबी व परविंदरसिंग ऊर्फ हॅपीसिंग भरभजनसिंग पंजाबी यांच्यासोबत इतर चार ते पाच जणं दाखल झाले. त्यांच्या हातात तलवार, गुप्ती, टॅमी, लोखंडी रॉड व बेसबॉलच्या दांडक्याचा त्यांच्याकडून सर्रास वापर करण्यात आला. शिवीगाळ करीत हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड आणि कागदपत्रे लांबविण्यात आली. हॉटेलमधील कर्मचारी यांना मारहाण करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या काही वाहनांचे नुकसान करण्यात आले. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याप्रकरणी सहजिवन नगरात राहणाऱ्या सुकविंदरसिंगकौर हरभजनसिंग पंजाबी (४६) या महिलेने मोहाडी पोलीस ठाणे गाठले आणि दोघा भावांसह त्यांच्यासह असलेल्या ४ ते ५ जणांविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघा भावांसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.