धुळ्यात तरूणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 11:56 IST2017-06-13T11:56:10+5:302017-06-13T11:56:10+5:30

गल्ली क्रमांक पाचमधील घटना. 16 जणांविरूध्द गुन्हा

Assault on a man in Dhule | धुळ्यात तरूणावर प्राणघातक हल्ला

धुळ्यात तरूणावर प्राणघातक हल्ला

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.13 - शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील रामभाऊ दाढीवाला खुंट परिसरात जाब विचारल्याच्या कारणावरून  15 ते 16 जणांनी हातात लाठय़ा- काठय़ा, तलवारी व धारधार शस्त्रे घेऊन तरूणावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल़े रविवारी रात्री ही घटना घडली़ याप्रकरणी 16 जणांविरूध्द आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
देवेश रामचंद्र साळुंखे (रा़ गल्ली क्ऱ 5-6 ची बोळ, माधवपुरा, धुळे) असे जखमी तरूणाचे नाव आह़े त्याने भोला उर्फ हरिचंद्र वाघ याच्यासह इतरांना तुम्ही माङया पत्नीला ईल शब्द वापरून छेड का काढता? अशी विचारणा केली़ त्याचा राग येऊन रविवारी रात्री 11़30 वाजेच्या सुमारास भोला वाघ याच्यासह किशोर बाबूराव वाघ, मोहीत किशोर वाघ, रणदीर वाघ, कुणाल संजय फरताडे, रोहित किशोर वाघ, भावेश संजय फरताडे, शुभम संजय वाघ, भोला वाघचा भाचा, बाळू उर्फ खंडेराव रमेश परभणे, गोविंद वाघ व इतर चार ते पाच जण सर्व (रा़ माधवपूरा) यांनी  हातात लाठय़ा- काठय़ा, तलवारी व धारधार शस्त्रे घेऊन देवेश साळुंखे याच्यावर हल्ला केला़ त्याला मारहाण करून गंभीर जखमी केल़े तसेच त्याच्या सोबत असलेला दिलीप कदम हा देखील जखमी झाला आह़े  
घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक हिमंत जाधव, पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह कर्मचा:यांनी रविवारी रात्री उशिरार्पयत संशयितांची धरपडक सुरू केली़ सोमवारी रात्री रणदीर वाघ व गोविंद वाघ या दोघांना अटक केली़ तर इतर फरार झाले असून फरार असलेल्यांचा शोध पोलिसांतर्फे घेण्यात येत  आहे. 

Web Title: Assault on a man in Dhule