शेतीच्या हिस्से वाटणीवरुन झाला शाळकरी मुलाचा खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:07 IST2019-12-17T14:07:34+5:302019-12-17T14:07:58+5:30

बोराडीतील घटना : दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Assassination attempt of schoolchildren over sharing of farmland | शेतीच्या हिस्से वाटणीवरुन झाला शाळकरी मुलाचा खुनाचा प्रयत्न

शेतीच्या हिस्से वाटणीवरुन झाला शाळकरी मुलाचा खुनाचा प्रयत्न

धुळे : क्लाससाठी जात असलेल्या मुलावर दोघांनी दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला़ एवढ्यावरच न थांबता त्याला हाताबुक्याने मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात शनिवारी घडली़ दरम्यान, शेतीच्या हिस्से वाटणीवरुन मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सोमवारी दोघांविरुध्द दाखल झाला़
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे राहणारा यश गजानन बडगुजर (१३) हा मुलगा घरातून निघून क्लाससाठी जात होता़ ही संधी साधून दोन जणांनी त्याच्या अंगावर दुचाकी चालविण्याचा प्रयत्न केला़ प्रसंगावधान राखत यश याने आपला जीव वाचवत रस्त्याच्या बाजुला उभी असलेल्या बोलेरो गाडीच्या पायदानावर चढला़ यानंतर त्याच्या अंगावर दुचाकी चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी त्याच्या हाताला जोराची ठोस दिली़ यात त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने हात फॅक्चर झाला आहे़ एवढ्यावरच न थांबता त्याला हाताबुक्याने मारहाण करण्यात आल्याने पोटाला दुखापत झाली आहे़ ही घटना १४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बोराडी गावातील बडगुजर गल्लीत श्याम पाटील यांच्या घरासमोर घडली़ यावेळी बºयापैकी गर्दी देखील जमा झाली होती़ मारहाण केल्यानंतर दोघे घटनास्थळावरुन पसार झाले़ यश बडगुजर याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत़
मारहाणीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ त्यांनी निर्माण झालेली तणावावी परिस्थिती नियंत्रणात आणली़
यश बडगुजर याने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी साडेदहा वाजता फिर्याद दिली़ त्यानुसार, संशयित अविनाश गंगाराम बडगुजर, सतिष अविनाश बडगुजर (दोन्ही रा़ बोराडी ता़ शिरपूर) यांच्याविरोधात भादंवि कलम ३०७, २७९, ३३८, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title: Assassination attempt of schoolchildren over sharing of farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.