फागण्यात अरविंद जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 11:18 IST2020-01-09T11:18:12+5:302020-01-09T11:18:35+5:30

बुधवारी रात्रीची घटना : ग्रामस्थांसह घटनास्थळी पोलीस दाखल

Arvind Jadhav's office vandalized | फागण्यात अरविंद जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड

फागण्यात अरविंद जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड

धुळे : जिल्हा परिषदेच्या फागणे गटातून विजय संपादन करणारे माजी सभापती प्रा़ अरविंद जाधव यांच्या फागणे येथीलच कार्यालयाची समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना बुधवारी रात्री घडली़ ही बाब गुरुवारी सकाळी उजेडात आली़ हल्लेखोरांनी कार्यालयातील खुर्च्यांही तोडून टाकल्या आहेत़ कार्यालयात असलेली रक्कमही लंपास करण्यात आली आहे़ हल्लेखोरांनी एका एटीएम मशिनवर देखील दगड भिरकाविल्याचे समोर आले आहे़ घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे़ घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी धाव घेतली आहे़ हल्लेखोर कोण? त्यांचा काय उद्देश होता याचा तपास पोलीस घेत आहेत़

Web Title: Arvind Jadhav's office vandalized

टॅग्स :Dhuleधुळे