वृद्ध साहित्यिकांसह कलावंतांना चार महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा लागून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST2021-02-11T04:37:59+5:302021-02-11T04:37:59+5:30
राज्यस्तरीय निवड समितीतर्फे साहित्य, कला किंवा वाङ्मय क्षेत्रात १५ ते २० वर्षे या कालावधीत महत्त्वपूर्ण कामगिरी ६० ...

वृद्ध साहित्यिकांसह कलावंतांना चार महिन्यांपासून मानधनाची प्रतीक्षा लागून
राज्यस्तरीय निवड समितीतर्फे साहित्य, कला किंवा वाङ्मय क्षेत्रात १५ ते २० वर्षे या कालावधीत महत्त्वपूर्ण कामगिरी ६० कलावंत व साहित्यिकांची निवड केली जाते. त्यासाठी कलावतांना शासनाच्या अनुदानासाठी साहित्य, कलाक्षेत्रातील पुरावे, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला व कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण केल्यानंतर निवड केली जाते. कलावंतांना राष्ट्र, राज्य व जिल्हास्तर अशा तीन प्रकारात मानधन देण्यात येते. जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील एक, राज्य स्तर चार आणि जिल्हास्तरावर ५२५ वृद्ध साहित्यिक व कलावंत आहेत. चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे मानधन वितरित करण्यात आले होते. मात्र ऑक्टोबर ते जानेवारी अशा चार महिन्याचे अद्याप मानधन कलावंताना मिळालेले नाही. गत काही महिन्यापासून मानधन थकीत असल्याने वृद्ध साहित्यिक व कलावंतांसमोर आर्थिक पेच निर्माण होत आहे. उदरनिर्वाहासाठी लागणारे साहित्य विकत घ्यावे कसे, असा प्रश्न वृद्ध कलावंतांसमोर उभा ठाकला आहे.