पुरोगाम्यांच्या हत्या करणाऱ्या सूत्रधारांना अटक करा, सिंदखेडा अंनिसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST2021-08-21T04:41:16+5:302021-08-21T04:41:16+5:30

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण होऊनही अद्यापपावेतो मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. या सर्व ...

Arrest the masterminds who killed the progressives, demands Sindkheda Annis | पुरोगाम्यांच्या हत्या करणाऱ्या सूत्रधारांना अटक करा, सिंदखेडा अंनिसची मागणी

पुरोगाम्यांच्या हत्या करणाऱ्या सूत्रधारांना अटक करा, सिंदखेडा अंनिसची मागणी

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण होऊनही अद्यापपावेतो मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. या सर्व गुन्ह्यांमध्ये साम्य असून, सर्वच आरोपी आणि सूत्रधार एकमेकांशी जोडले गेल्याचे निष्पन्न होत आहे.

या पार्श्वभूमीवर त्या त्या राज्यातील शासनाने पंतप्रधान कार्यालयामार्फत हत्येचा समान धागा गृहीत धरून, तपास यंत्रणांना एकत्र कामाला लावावे आणि सूत्रधाराचा चेहरा समाजापुढे आणावा. या तपासणीमध्ये सात-आठ वर्षे दिरंगाई होत असल्याने, ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शिंदखेडा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा.दीपक माळी, प्रा.भीमराव कढरे, प्रा.परेश शहा, संदीप गिरासे भिका पाटील, योगेश गिरासे, प्रा.महानोर, जयपाल गिरासे, देवेंद्र नाईक उपस्थित होते.

Web Title: Arrest the masterminds who killed the progressives, demands Sindkheda Annis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.