शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षकांची नियुक्ती करा; शिक्षक भारती संघटना : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST2021-07-02T04:24:50+5:302021-07-02T04:24:50+5:30
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने प्राथमिक शिक्षण अधिकारी ...

शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षकांची नियुक्ती करा; शिक्षक भारती संघटना : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने प्राथमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी निवेदन स्वीकारले. धुळे जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी शिक्षण अधिकारी व वेतन अधीक्षक नसल्याने जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महिना संपल्यावरदेखील कर्मचाऱ्यांचे वेतन होत नाही. कार्यालयात वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत. अनेक मुख्याध्यापकांचे मान्यता प्रस्ताव पडलेले आहेत. त्यामुळे मान्यताअभावी शिक्षकांचे पगार झालेले नाहीत.
शिक्षण क्षेत्रातील या सर्व समस्या पाहता कायमस्वरूपी शिक्षणाधिकाऱ्यांची नितांत गरज आहे. त्यामुळे आपण लक्ष घालून माध्यमिक शिक्षण विभागाला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील, खेमचंद पाकळे, सुधाकर पाटील, राजेंद्र पाटील, विनोद रोकडे, जयवंत पाटील, नाना महाले, किरण मासुळे, विजय सोनवणे, विजय सूर्यवंशी, साहेबराव जाधव आदींनी केली आहे.