दुधाळ गट व शेळी गटासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST2021-02-14T04:33:43+5:302021-02-14T04:33:43+5:30
या योजनेत जिल्हास्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना २ दुभत्या जनावरांचे वाटप होईल. त्यात ४० हजार रुपये किमतीपर्यंतच्या २ संकरीत गाई/ ...

दुधाळ गट व शेळी गटासाठी २६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
या योजनेत जिल्हास्तरीय अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना २ दुभत्या जनावरांचे वाटप होईल. त्यात ४० हजार रुपये किमतीपर्यंतच्या २ संकरीत गाई/ म्हशींचे वाटप होईल. यात प्रकल्प किंमत ८५ हजार ६१ रुपये आहे. त्यात ७५ टक्के अनुदान असेल. अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना १० शेळ्या व १ बोकड वाटप करण्यात येईल. या शेळी गटाची किंमत प्रति शेळी ६ हजार रुपये व बोकडाची किंमत ७ हजार रुपये असेल. या प्रकल्पाची किंमत ७१ हजार २३९ असून, ७५ टक्के अनुदान राहील. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी पात्र राहतील. या योजनेत ३० टक्के महिला व तीन टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल, असेही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.लंघे यांनी म्हटले आहे.