मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST2021-02-14T04:33:47+5:302021-02-14T04:33:47+5:30
योजनेची वैशिष्ट्ये : मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने ...

मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
योजनेची वैशिष्ट्ये : मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मधाची खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध, मधमाशा संरक्षक व संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक राहील. वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षणासाठी पात्रता : अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. केंद्र चालक प्रगतिशील मधपाळ, संस्था व्यक्ती प्रशिक्षणासाठी पात्रता : अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावा, वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्त्वावरील शेतजमीन असावी, लाभार्थ्याकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत नागरिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक संस्था प्रशिक्षणासाठी पात्रता : संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे, मालकीची किंवा दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर एक एकर घेतलेली शेतजमीन असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट इमारत असावी, संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत नागरिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, जमनागिरी रोड येथे संपर्क साधावा.