राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST2021-08-21T04:40:59+5:302021-08-21T04:40:59+5:30
महापूर, दरड कोसळल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गरीब, कष्टकरी, मजुरांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू, ...

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन
महापूर, दरड कोसळल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गरीब, कष्टकरी, मजुरांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधोपचार आदी मदत करण्याची आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यांच्यासाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहेच; मात्र सामाजिक बांधीलकी व सामाजिक उत्तरदायीत्व अशा उद्देशाने स्थापन झालेल्या सर्व धर्मादाय संस्थांनी (ट्रस्ट) मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. जेणेकरून गरजूंना शक्य ती मदत करता येईल. त्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून गरजूंना धर्मादाय संस्थांनी शक्य ती मदत करावी, तसेच आर्थिक स्वरूपात मदतीसाठी मा. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदत पुढील बँक खात्यावर चेक किंवा डी.डी.द्वारे शक्य तितक्या लवकर करावी.