अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST2021-08-25T04:40:36+5:302021-08-25T04:40:36+5:30
सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६० टक्के ...

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम तीन ते पाच विद्यार्थ्यांना उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.
अर्जासमवेत पुढील कागदपत्रे जोडावीत. त्यात पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाइड प्रमाणपत्र जोडावे. अर्ज जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे सादर करावा. अधिक माहितीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवनमागे, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा.