आमदार अनिल गोटेंची जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 12:18 IST2018-05-05T12:18:40+5:302018-05-05T12:18:40+5:30

धुळ्यात जुगार तेजीत : पोलिसांचा बंदोबस्त, बघ्यांची वाढली गर्दी

Anil Gotenke, a soldier on the gambling stand | आमदार अनिल गोटेंची जुगार अड्ड्यावर धाड

आमदार अनिल गोटेंची जुगार अड्ड्यावर धाड

ठळक मुद्देआमदार अनिल गोटे यांची कारवाईअवैधधंदेवाल्यांचे धाबे दणाणलेपोलिसांचा बंदोबस्त कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पांझरा नदी किनारी असलेल्या गणपती मंदिराच्या मागील बाजूस सुरु असलेला जुगाराचा अड्डा आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उध्वस्त केला़ घटनास्थळी शहर पोलीस दाखल झाले होते़ 
शहरात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याची ओरड कायम होत असते़ त्याअनुषंगाने पोलिसांकडून कारवाई देखील होत असते़ तरी देखील सट्टा, जुगार सुरु असल्याचे समोर आले आहे़ आमदार अनिल गोटे यांनी मागील ३ ते ४ महिन्यांपुर्वी श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर कारवाई करत जुगाराचा अड्डा उध्वस्त केला होता़ तशाच प्रकारची कारवाई पुन्हा आमदारांनी केली आहे़ शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आमदारांनी अचानक गणपती मंदिरामागील बाजूस धाड टाकली़ तेथे सुरु असलेला जुगाराचा अड्डा उध्वस्त केला़ घटनास्थळी पोलीस दाखल असून कारवाई सुरु आहे़ नेमके काय झाले हे पाहण्यासाठी मात्र सामान्यांनी गर्दी केली होती़ 

Web Title: Anil Gotenke, a soldier on the gambling stand