संतप्त शेतकऱ्यांनी जामफळचे काम बंद पाडले, महामार्गावर रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 22:37 IST2021-02-02T22:37:16+5:302021-02-02T22:37:45+5:30

शिंदखेडा पोलीस निरीक्षकांची मध्यस्थी : जिल्हाधिकाऱ्यांशीही केली चर्चा

Angry farmers stopped work on the jam, rastaroko on the highway | संतप्त शेतकऱ्यांनी जामफळचे काम बंद पाडले, महामार्गावर रास्तारोको

संतप्त शेतकऱ्यांनी जामफळचे काम बंद पाडले, महामार्गावर रास्तारोको

धुळे : शेतकºयांचे भाग्य बदलणाºया जामफळ सुलवाडे कान्होली प्रकल्पाचे काम शेतकºयांनी बंद पाडले. शेतजमीनी पाण्याखाली गेल्यानंतर देखील मोबदला मिळत नसल्याचा आरोप करीत मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला. परिणामी काही काळ तणाव निर्माण झाला होता. लागलीच शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी नियंत्रण आणत शेतकºयांची समजूत काढली. आंदोलन करणाºया शेतकºयांना जिल्हाधिकारी यांच्या भेटीला घेवून आले. प्रश्न तडीस नेण्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकºयांचा संताप कमी झाला. पोलीस निरीक्षक तिवारी यांची मध्यस्थी फलदायी ठरली.
महत्वाकांक्षी अशा सुलवाडे जामफळ प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. या कामासाठी भूमिअधिग्रहणही शासनातर्फे करण्यात आले आहे. अनेकांना भूमिअधिग्रहणात मोबदला मिळाल्याचे समोर येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यांना मोबदला देखील मिळाला आहे. मात्र, सोनगीर, सोंडले शिवारात जामफळ धरणाचे काम सुरु असून त्यात सोनगीर व सोंडल्याचे शेतकºयांच्या सुमारे ५०० हेक्टर शेतजमिनी या पाण्याखाली जात आहेत. या बाधीत शेतकºयांना मोबदला मात्र मिळालेला नाही. त्यासाठी त्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून काही दिवसांपुर्वी आंदोलन देखील केले. या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना शेतकºयांची आहे.
मंगळवारी जामफळ धरणाचे काम सुरु असताना संतप्त शेतकरी घटनास्थळी गेले. त्यांनी कामबंद पाडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यासोबतच शेतकºयांनी महामार्ग रोखून धरला. घटनेची माहिती मिळताच शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी पोलीसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकºयांची भावना समजून घेत त्यांना विश्वासात घेतले. काम सुरु द्या असे म्हणत आपण शेतीच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटू, असे सांगत त्यांनी त्यांचाच गाडीतून शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून आले. तेथे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. हे प्रकरण शिरपूरचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी बोलणे करुन दिले. येत्या पाच ते सहा दिवसात अहवाल पाठवून शेतकºयांच्या मोबदल्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आंदोलन करणाºया शेतकºयांना आश्वासीत करण्यात आले. यानंतरही प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा केदारेश्वर मोरे, अविनाश महाजन, रविंद्र माळी, भटू धनगर, लखन रुपनर, श्याम माळी, पराग देशमुख, दंगल धनगर आदींनी दिला आहे.

Web Title: Angry farmers stopped work on the jam, rastaroko on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे