वीज कट केल्याचा राग, सहायक अभियंत्याला दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST2021-03-21T04:35:48+5:302021-03-21T04:35:48+5:30
शहरासह जिल्ह्यात सध्या वीज बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई जोरात सुरू आहे. लॉकडाऊन काळापासून, तसेच नंतर थकीत वीज ...

वीज कट केल्याचा राग, सहायक अभियंत्याला दमदाटी
शहरासह जिल्ह्यात सध्या वीज बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई जोरात सुरू आहे. लॉकडाऊन काळापासून, तसेच नंतर थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणची धडक मोहीम सध्या वादग्रस्त बनली आहे. दररोज कुठे ना कुठे यातून वाद आणि भांडणे होऊ लागली आहेत. वीज कनेक्शन कट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामान्य लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, तसेच अधिकारी वर्गाबद्दलही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. असाच प्रकार शुक्रवारी देवपुरातील तुळशिराम नगर कक्ष कार्यालय गोंदूर रोड येथे घडला. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सहायक अभियंता सुनील पाटील हे कार्यालयात असताना अविनाश प्रभाकर चंद्रा (रा. श्रीराम कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) या संशयित ग्राहकाने येऊन आपल्या घराचे वीज कनेक्शन कोणी कट केले, का कट केले असे म्हणत कार्यालयात आरडाओरड करीत शिवीगाळ केली. सहायक अभियंता सुनील पाटील यांना दमदाटी व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.