शहरामध्ये दररोज १०० रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:08+5:302021-04-28T04:39:08+5:30
धुळे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये बेडसाठी प्रतीक्षा आहे. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका किंवा स्वत:च्या वाहनांमधून ...

शहरामध्ये दररोज १०० रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्सची भटकंती
धुळे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये बेडसाठी प्रतीक्षा आहे. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका किंवा स्वत:च्या वाहनांमधून येणाऱ्या अंदाजे १०० पेक्षा अधिक रुग्णांची बेडसाठी दिवसभर भटकंती होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, १०८ ॲम्ब्युलन्समधून येणाऱ्या कोरोना रुग्णांना मात्र थेट सरकारी कोविड रुग्णालयात भरती केले जात असल्याने दिलासा आहे. ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये दाखल एखाद्या रुग्णाची प्रकृती खालावली तर त्यांना निर्दिष्ट केलेल्या रुग्णालयात दाखल केले जाते. एखाद्या रुग्णाने स्वत: काॅल करून ॲम्ब्युलन्स बोलावली तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते, अशी माहिती १०८ ॲम्ब्युलन्सचे जिल्हा व्यवस्थापक डाॅ. उमेश साने यांनी दिली. कोरोनासाठी जिल्ह्यात स्वतंत्र आठ रुग्णवाहिका दिल्या असून दुसऱ्या लाटेत नऊ हजार ९८० रुग्णांना सेवा दिल्याची माहितीही डाॅ. साने यांनी मंगळवारी दिली.
खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये जनरल बेड शिल्लक असले तरी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी मात्र प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या नातेवाइकांना दिवसभर भटकंती करावी लागते. खासगी रुग्णालयात बेड मिळाले नाहीत तर सरकारी रुग्णालयांमध्ये मात्र रुग्णाची परिस्थिती पाहून सहकार्य केले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांच्या ४९ रुग्णवाहिका आणि १०८ च्या १८ रुग्णवाहिकांमधून दिवसरात्र रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरू आहे.
दिवसभरात किती फिरावे लागते
५ ते १० फेऱ्या
नियंत्रण कक्षातून आलेल्या सूचनांनुसार दिवसभर रुग्णांची वाहतूक करावी लागते. रोज सरासरी ५ ते १० फेऱ्या होतात, अशी माहिती रुग्णवाहिका चालक सचिन थोरात (धुळे) यांनी दिली.
२० ते २५ फेऱ्या
पिंपळनेर परिसरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने रोज नियंत्रण कक्षाला काॅल जातात. रोज सरासरी २० ते २५ फेऱ्या माराव्या लागतात, अशी माहिती विनोद बोरसे (पिंपळनेर) यांनी दिली.
१० ते १५ फेऱ्या
रोज सरासरी २० ते २५ पेशंट ऑक्सिजनची गरज असलेले असतात. नियंत्रण कक्षातून आलेल्या सूचनांनुसार त्यांना रुग्णालयात नेऊन सोडतो, अशी माहिती चालक प्रमोद पाटील (बोरकुंड) यांनी दिली.
कोरोना रुग्णालयांमधील बेडची स्थिती
हाॅस्पिटलचे नावएकूण बेडवापरशिल्लक
देवरे हॉस्पिटल ५२ १९ ३३
सुधा हॉस्पिटल २२ २२ ००
सिद्धेश्वर हॉस्पिटल १५ १५ ००
तेजनक्ष हॉस्पिटल ११ ०९ ०२
जवाहर फाऊंडेशन २४० ८८ १५२
ओम क्रिटिकल केअर ५० २५ २५
सेवा हॉस्पिटल ४० ४० ००
लोकमान्य हॉस्पिटल १०० २२ ७८
श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल ४५ ४४ ०१
श्रद्धा हॉस्पिटल ८८ ८८ ००
श्री गणेश हॉस्पिटल ४० ४० ००
अलमसिरा हॉस्पिटल ०८ ०८ ००
साई सुंदर हॉस्पिटल १४ १४ ००
दशक हॉस्पिटल २० २० ००
अंजना हार्ट हॉस्पिटल २५ १७ ०८
इकरा हॉस्पिटल २२ १३ ०९
शिफा हॉस्पिटल ३० ३० ००
केशरानंद हॉस्पिटल ५० ४३ ०७
समर्थ नारायण हॉस्पिटल ०५ ०५ ००
रुब्बीक हॉस्पिटल १७ १० ०७
आयुष हॉस्पिटल ०३ ०३ ००
महाकाली हॉस्पिटल १० ०७ ०३
धनदाई हॉस्पिटल १० १० ००
विजयदीप हॉस्पिटल १० ०७ ०३
साईबाबा हॉस्पिटल ०५ ०५ ००
आदर्श हॉस्पिटल ०३ ०३ ००
आशीर्वाद हॉस्पिटल २५ २० ०५
साई हॉस्पिटल १९ १९ ००
श्री ओमकार हॉस्पिटल २४ १८ ०६
हिरे वैद्यकीय महाविद्यालय ३१३ २८० ३३
डीसीएचसी सिव्हिल ५७ ५६ ०१
डीसीएचसी अजमेरा ४१ ३० ११
डीसीएचसी पाॅलिटेक्निक १२० १३ १०७
यशोदा हाॅस्पिटल १३ १३ ००