रामी फाट्यावर ‘पिकअप’च्या अपघातात अमळनेरचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 22:44 IST2020-02-07T22:43:54+5:302020-02-07T22:44:23+5:30
समोरासमोर धडक : जुनवणेचा तरुण जखमी, दोंडाईचा पोलिसात नोंद

रामी फाट्यावर ‘पिकअप’च्या अपघातात अमळनेरचा तरुण ठार
धुळे : पिकअप आणि दुचाकी यांच्यात अपघाताची घटना शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचानजिक रामी फाट्यावर ३ फेब्रुवारी रोजी घडली़ यात अमळनेर येथील तरुणाचा मृत्यू झाला़ तर, जुनवणे गावातील तरुण गंभीर जखमी झाला़ अपघात प्रकरणाची नोंद दोंडाईचा पोलीस ठाण्यात करण्यात आली़
एमएच ३९ एडी ०४६३ क्रमांकाची पिकअप आणि एमएच १८ बीके ६७६५ क्रमांकाची दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला़ ही घटना दोंडाईचा ते नंदुरबार रोडवर धावडे गावाजवळील रामी फाट्यावर ३ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली़ यात दिनेश भिमराव घागरे (४५, रा़ लक्ष्मीनगर, ढेकू रोड, अमळनेर) आणि निलेश नारायण खैरनार (२५, रा़ जुनवणे ता़ धुळे) या दोघांना गंभीर दुखापत झाली़ तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आले़ उपचार सुरु असताना दिनेश भिमराव घागरे यांचा मृत्यू झाला़ तर निलेश खैरनार या तरुणावर उपचार सुरु आहेत़
याप्रकरणी उज्वल भिमराव घागरे (४३, रा़ चोपडा) यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिकअप वाहन चालकाविरुध्द भादंवि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, अपघात कसा झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत़