कांद्यावर बुरशी लागण्याचे प्रमाण वाढले असेल तरी यावर उपाय शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:17+5:302021-09-19T04:37:17+5:30
मालपूरसह संपूर्ण परिसरात सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस लाल, तर नगदी कांदा पिकाची पात पिरगळून वाफे बसण्याचा ...

कांद्यावर बुरशी लागण्याचे प्रमाण वाढले असेल तरी यावर उपाय शक्य
मालपूरसह संपूर्ण परिसरात सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजला जाणारा कापूस लाल, तर नगदी कांदा पिकाची पात पिरगळून वाफे बसण्याचा प्रमाणात या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी मालपूर, कलवाडे, चुडाणे रोड आदी शेतशिवारात शेत बांधावर जाऊन कापूस व कांदा पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत दोंडाईचा मंडळ कृषी अधिकारी नवनाथ सांबळे. कृषी पर्यवेक्षक एच. पी. बाविस्कर आदी उपस्थित होते.
अतिवृष्टी व गेल्या महिनाभरापासून आभाळ झाकलेले आहे. पुरेशा प्रमाणात पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही. जमिनीत ओलावा कायम असल्याने जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कांदा पिकावर काय उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष मोबाइलवरून शेतकऱ्यांचे बोलणेदेखील करून दिले. हवामानातील बदलामुळे पिकांची अशी परिस्थिती झालेली दिसून येत आहे. यावेळी शेतकरी किसन खलाणे, नंदलाल पाकळे, काशीनाथ अहिरे, विक्रेते प्रशांत आडगाळे पत्रकार रवींद्र राजपूत आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
180921\20210915_171607.jpg
मालपूर येथे पीक पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे नवनाथ साबळे