सर्व नगरसेवकांना समान निधीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:56+5:302021-03-28T04:33:56+5:30
मनपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना हाताशी धरून ठरावीक प्रभागांत संपूर्ण निधी वापरून घेत असल्याच्या तक्रारी आमदार फारुक शाह यांच्याकडे ...

सर्व नगरसेवकांना समान निधीचे वाटप
मनपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना हाताशी धरून ठरावीक प्रभागांत संपूर्ण निधी वापरून घेत असल्याच्या तक्रारी आमदार फारुक शाह यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० कोटींच्या विशेष निधीतून काही ठरावीक प्रभागांत कोट्यवधींची कामे झालेेली आहेत. यात अल्पसंख्याक प्रभागात कुठलाही निधी देण्यात आलेला नाही. सदरील बाब अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. राज्य शासनाकडून येणारा विशेष निधी, तसेच इतर निधी सर्व प्रभागांमध्ये समान पद्धतीने वाटप करावा. यासाठी आयुक्त, मुख्याधिकारी, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करून विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. शासनाच्या विकासकामांच्या निधीतून केवळ मोजक्या प्रभागांमधील विकासकामांवर भर न देता शक्यतोवर सर्व प्रभागांमधील विकासकामे समान पद्धतीने होतील, याची दक्षता घेण्यात यावी, असे निवेदन नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना आमदार शाह यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २४ मार्च २०२१ रोजी नगरविकास विभागाने सर्वांना समान निधी वाटप करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नगरसेवकांना समान निधी मिळणार असल्याचे आमदार शाह यांनी म्हटले आहे.