तेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:56 IST2018-11-16T13:54:46+5:302018-11-16T13:56:20+5:30
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या आरोपांना पत्रकार परिषदेत उत्तर

तेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे
आॅनलाइन लोकमत
धुळे : तेलगी प्रकरणात माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत, असे स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्व़ गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले़ त्यांना म्हणून मला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली, असे प्रत्युत्तर आमदार अनिल गोटे यांनी डॉ़ सुभाष भामरे यांच्या आरोपांना दिले़
संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अनिल गोटेंवर टिका केली़ या टिकेला उत्तर देण्यासाठी आमदार अनिल गोटे यांनीही पत्रकार परिषद घेतली़ त्यावेळी ते बोलत होते़ डॉ़ भामरे यांनी, गोटे यांच्यावर देशद्रोहाचा आरोप असतांना पक्षाने त्यांना विधानसभेला संधी देऊन निवडून आणल्याचे सांगितले होते़ त्यावर बोलतांना गोटे यांनी सांगितले की, केवळ मी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून मला तेलगी प्रकरणात अडकविण्यात आले हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य होते़ म्हणून पक्षाने मला विधानसभेसाठी उमेदवारी दिली़ तेलगी प्रकरणातील आरोप इतके तकलादू होते की मी वकील न लावता स्वत:ची बाजू स्वत: मांडत जामीन मिळवला, असे गोटे म्हणाले़ ज्या व्यक्तीला महिलांनी चपलेने मारले, पोलीसांवर हल्ला केला त्यांना पदाधिकारी पक्षात प्रवेश देत असतील, तर हे दुर्देव आहे़ मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग ९ हजार ५०० कोटींचा आहे़ नियमानुसार त्यापैकी किमान १० टक्के म्हणजेच ९५० कोटींचा निधी उपलब्ध असल्याशिवाय निविदा काढता येत नाही, तरी ४७ कोटींची निविदा कशी काढली? शिवाय एकानेही ही निविदा भरलेली नाही, असे गोटे म्हणाले़ मला कुणी निवडणूक प्रक्रिया शिकवण्याची गरज नाही़ शहराच्या कल्याणासाठी मी आमदारकीचा राजीनामा देतो आहे़ हिंमत असेल तर संरक्षण राज्यमंत्र्यांनी राफेल प्रकरणावरून राजीनामा देऊन माझ्याविरोधात उभे राहावे, असे आमदार गोटे म्हणाले़