जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा सुरू नववी ते दहावीच्या ८१ शाळा अद्याप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST2021-02-11T04:38:02+5:302021-02-11T04:38:02+5:30
साक्री तालुक्यातील ३५ शाळा बंद - साक्री तालुक्यातील नववी ते दहावीच्या सर्वाधिक ३५ शाळा अद्याप बंद आहेत. तर शिंदखेडा ...

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा सुरू नववी ते दहावीच्या ८१ शाळा अद्याप बंद
साक्री तालुक्यातील ३५ शाळा बंद -
साक्री तालुक्यातील नववी ते दहावीच्या सर्वाधिक ३५ शाळा अद्याप बंद आहेत. तर शिंदखेडा तालुक्यातील केवळ एक शाळा बंद आहे. शिरपूर शहरातील ४ तर तालुक्यातील ग्रामीण भागातील १५ शाळा बंद असल्याचे सांगण्यात आले. तसेच सद्या बंद असलेल्या शाळांमध्ये धुळे मनपाच्या १५ शाळांचाही समावेश आहे. कोरोना काळात शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर होते. त्यामुळे काही शाळा अद्याप बंद आहेत.
शाळा बंद असल्याची करणे -
बहुतेक शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर करण्यात आले होते. सध्या बंद असलेल्या काही शाळा क्वारंटाईन सेंटर होत्या. तसेच गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे काही शाळा बंद असल्याची माहिती मिळाली. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षक व विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे अशा शाळा पुढील १५ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एका शिक्षकाचे अहवाल पॉझिटिव्ह -
जिल्ह्यात शाळा सुरू झाल्यानंतर एक शिक्षक व काही विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकार घडले आहेत. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, याबाबत माहिती उपलब्ध नाही. शिक्षक किंवा विद्यार्थी बाधित आढळल्यानंतर १५ दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे काही शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. सॅनिटरायझेशनची व्यवस्था काही शाळांनी केली आहे.
पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा सुरू -
पाचवी ते आठवीच्या शाळांपैकी एकही शाळा सद्या बंद नाही. विद्यार्थ्यांची उपस्थिती सुरुवातीला कमी होती. मात्र त्यात वाढ होत आहे. बंद असलेल्या काही शाळा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करताना पालकांची संमतीपत्रे भरून घेतली आहेत.