साडेचार लाख रुपयांचा दारू साठा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 22:00 IST2021-01-15T22:00:24+5:302021-01-15T22:00:56+5:30
थाळनेर पोलिसांची कारवाई

साडेचार लाख रुपयांचा दारू साठा हस्तगत
थाळनेर :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना एका चार चाकी वाहनातून थाळनेर पोलिसांनी साडेचार लाख रुपयांचा अवैध दारुचा साठा हस्तगत केला़ ही कारवाई १४ जानेवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील पिंप्री फाट्यावर घडली़
शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने १४ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना एका कारमध्ये दारुचा अवैधसाठा नेला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या लगत असलेल्या शिरपूर तालुक्यातील पिंप्री फाट्याजवळ थाळनेर पोलिसांनी सापळा लावला़ त्यावेळेस जीजे ०५ सीएफ ४४७० क्रमांकाची कार आल्यानंतर ती थांबविण्यात आली़ कारची तपासणी केली असता त्यात विदेशी दारूचे ५० बॉक्सची अवैधरित्या ठेवलेले आढळून आले़ पोलिसांनी वाहनासह दारुचा साठा ताब्यात घेतला आहे़ जप्त केलेला दारुचा साठा ३ लाख १२ हजार रुपये किंमतीचा असून कार १ लाख ५० हजार रुपयांची आहे़ असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे़
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने केली़