एअर डोम काढून दुकानात हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 10:35 PM2019-10-20T22:35:13+5:302019-10-20T22:35:36+5:30

एकावर संशय : १ लाख १२ हजार लंपास

Air Dome Cleaning Shop | एअर डोम काढून दुकानात हातसफाई

एअर डोम काढून दुकानात हातसफाई

Next

धुळे : दुकानाच्या छताला लावण्यात आलेले एअर व्हेंटीलेशन अर्थात डोम काढून दुकानात प्रवेश करुन गल्ल्यात ठेवलेले १ लाख १२ हजाराची रोकड लांबविल्याची घटना धुळ्यातील गल्ली नंबर ४ मध्ये घडली़ याप्रकरणी जुने धुळ्यातील एका संशयिताविरुध्द गुन्हा दाखल झाला़ 
अभय कॉलेज परिसरातील शिव कॉलनी शांतीनगर भागात राहणारे सागर कैलास पाटणी यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, पाटणी यांचे गल्ली क्रमांक ४ मध्ये बँक आॅफ   महाराष्ट्र समोर नवरत्न नावाचे जनरल स्टोअर्स आहे़ या दुकानाच्या छताच्या पत्र्याला एअर व्हेंटीलेशन अर्थात डोम बसविण्यात आलेला आहे़ नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन पाटणी आपल्या घरी निघून गेले़ सकाळी दुकान उघडल्यानंतर नेहमीप्रमाणे कामकाजाला सुरुवात झाली़ गल्ल्यात ठेवलेले पैसे त्यांना आढळून आले नाही़ शोधाशोध केल्यानंतर आपल्या दुकानात चोरी झाल्याचा अंदाज त्यांना आला़ त्यांनी दुकानाच्या वरच्या बाजुला पाहिल्यानंतर दुकानाच्या छताला लावलेला डोम बाजुला सरकलेला त्यांना दिसला़ हा डोम बाजुला करुन चोरटा दुकानात शिरला आणि त्याने गल्ल्यात ठेवलेले १ लाख १२ हजाराची रक्कम अगदी सहजपणे चोरुन नेल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले़ 
चोरीची ही घटना गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास सागर पाटणी यांनी आझादनगर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली़ त्यानुसार चोरट्याविरुध्द ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक एम़ एऩ सहारे घटनेचा तपास करीत आहेत़ 
संशयित शहरातला
नवरत्न जनरल स्टोअर्स या दुकानात कामावर असणारा जुने धुळे परिसरात राहणारा श्रीराम कैलास मिटकर याला कामावरुन पाटणी यांनी काढून टाकले होते़ त्यामुळे त्याने ही चोरी केली असावी असा संशय पाटणी यांना आहे़ याच संशयावरुन श्रीराम मिटकर विरुध्द गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे़ 

Web Title: Air Dome Cleaning Shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.