सामोडेत जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 21:58 IST2021-01-30T21:57:46+5:302021-01-30T21:58:30+5:30
प्रयोगशील शेतकरी नरेंद्र भदाणे यांच्याकडून जाणून घेतली माहिती

सामोडेत जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतीची पाहणी
पिंपळनेर : जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सामोडे या गावी येऊन शेतकरी डॉ. नरेंद्र भदाणे यांनी आपल्या शेतात विविध प्रयोगशील शेती करून शेती क्षेत्रातून उत्पादन कशा पद्धतीने वाढून घेता येईल यासंदर्भातची माहिती व शेतीची पाहणी केली. त्यांनी त्यांच्या शेती कार्याचे कौतुक केले आहे.
यावेळी रावसाहेब भदाणे, कृषि अधीक्षक विवेक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी ठाकरे, तसेच प्रांताधिकारी भीमराज दराडे, अप्पर तहीलदार विनायक थविल, तलाठी व कृषि अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकारी वर्गांना शेतात करत असलेल्या विविध प्रयोगशील शेती विषयी माहिती करून देणे तालुक्यातील सर्वात मोठे शेततळे उभारून याठिकाणी मत्स्यशेती यासोबतच, शेडनेट मधील शिमला मिरची हिरवी-लाल-पिवळी, ठिबकवरील ऊस, शेत तलावातील मत्स्य व तलावातील मत्स्य शेतीविषयी जाणून घेतलं, यापूर्वीदेखील तालुक्यात गुलाब शेती केली. काकडी, कांदे व रोप वाटीका, गांडूळ खत प्रकल्प असे विविध शेती उपक्रम राबीत असल्याची माहिती देण्यात आली.
डॉ. नरेंद्र भदाणे यांचे शेती विषयीचे कार्य पाहता त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे तसेच विदेशात देखील त्यांनी शेती पाहण्यासाठी निवड झाले आहे, विविध कृषी समितीवर त्यांची निवड झाली आहे. डॉ. भदाणे शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून नेहमी चर्चेत राहतात, शेती पारंपरिक सोबत आधुनिक पद्धतीने केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळते असे डॉ. भदाणे यांनी सांगितले.