मनसे विधी कक्षावर ॲड. सायली सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST2021-07-05T04:22:50+5:302021-07-05T04:22:50+5:30
सदर नियुक्ती ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी कक्षाचे राज्य अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे व अर्चित साखळकर यांच्या आदेशान्वये करण्यात ...

मनसे विधी कक्षावर ॲड. सायली सोनवणे
सदर नियुक्ती ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी कक्षाचे राज्य अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे व अर्चित साखळकर यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. त्यांची या पदासाठी नियुक्ती व्हावी म्हणून मनसेचे सरचिटणीस राजा चौगुले यांनी शिफारस केली होती.
सायली सोनवणे या मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तसेच मुंबई हायकोर्टात त्या काम पाहतात. विद्यार्थी सेनेत काम करत असताना त्यांनी आतापर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक प्रश्न तडीस नेले आहेत. बाल विवाह रोखण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले याशिवाय कोरोना काळातही त्यांनी प्लाझ्मा दान शिबिर आयोजित केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच गेल्यावर्षी पूरग्रस्तांना मदत म्हणून त्यांनी मुंबई येथून कपडे व धान्य पाठवण्यासाठी मदत केली होती त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मुंबईच्या कार्यकारिणीवर नियुक्ती देण्यात आली आहे. सायली सोनवणे या मालपूरचे माजी सरपंच संजय सोनवणे यांच्या कन्या तर पत्रकार आबा सोनवणे यांच्या पुतणी आहेत.