राजस्थानातील प्रौढाचा खासगी बसमध्ये मृत्यू

By देवेंद्र पाठक | Updated: May 12, 2023 17:03 IST2023-05-12T17:03:17+5:302023-05-12T17:03:57+5:30

चाळीसगाव रोड चौफुलीवर हा प्रकार लक्षात आला.

adult from rajasthan dies in a private bus | राजस्थानातील प्रौढाचा खासगी बसमध्ये मृत्यू

राजस्थानातील प्रौढाचा खासगी बसमध्ये मृत्यू

धुळे : राजस्थानमधून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसमध्ये बेशुद्ध अवस्थेत एक प्रौढ आढळून आला. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. चाळीसगाव रोड चौफुलीवर हा प्रकार लक्षात आला. गोपाललाल हजारीलाल (वय ५०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

राजस्थान राज्यातील अमरपुरा पो. बबराणा ता. बनेडा जि. भिलवाडा येथील रहिवासी गोपाललाल हजारीलाल (वय ५०) हे गुरुवारी राजस्थान येथून धुळ्याकडे एआर ०१ टी २०९७ क्रमांकाच्या लक्झरी बसमधून येत होेते. चाळीसगाव चौफुलीवर बस आली असताना ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. घटनेचे गांभीर्य ओळखता त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉ. चेतन यांनी तपासून मयत घोषित केले. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: adult from rajasthan dies in a private bus

टॅग्स :Dhuleधुळे