विद्यावर्धिनीत तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 11:28 IST2019-07-22T11:28:37+5:302019-07-22T11:28:52+5:30

विद्यावर्धिनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तंबाखू व्यसनमुक्तीची सामुहिकपणे शपथ देण्यात आली़

Adoption of tobacco addiction oath | विद्यावर्धिनीत तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ

विद्यावर्धिनीत तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : विद्यावर्धिनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तंबाखु व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली़ यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता़ 
येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंबाखू व्यसनमुक्तीची सामुहिकपणे शपथ देण्यात आली़ प्राचार्य डॉ़ ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संस्थेच्या सदस्या डॉ़ जयश्री गावित यांच्यासह प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ 
राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ़ प्रशांत लगडे यांनी यावेळी विद्यार्थी तंबाखू व्यसनापासून परावृत्त करण्याची सामुहिक शपथ दिली़ सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ़ संतोष खत्री आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले़ 

 

Web Title: Adoption of tobacco addiction oath

टॅग्स :Dhuleधुळे