चिमुकलीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:10 IST2019-05-10T23:04:58+5:302019-05-10T23:10:49+5:30

सरपंच व ग्रामस्थांचा आरोप : गावासाठी चार टँकरची मागणी करुनही दुर्लक्ष,भीषण पाणीटंचाई, १२ दिवसानंतर होतो पुरवठा

The administration is responsible for the death of a sperm | चिमुकलीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार 

dhule

ठळक मुद्देचिमुकली नंदिनीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदारदुसया दिवशी शुक्रवारी गावात व मयत नंदिनीच्या घरी शोककळा खाली उतरतांना नंदिनीचा तोल जाऊन  विहीरीत पडली गावांसाठी पाच टँकरची गरज असतांना अधिकाºयांनी केवळ दोनच  मंजूर

रविंद्र बोरसे
विंचूर : तालुक्यातील मोरदड तांडा येथील ऊसतोड मजुराची १३ वर्षीय चिमुकली नंदिनीचा  पाय घसरून विहरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यानंतर   तब्बल २४ तासानंतर दुसºया दिवशी झाला घटनेचा पंचनामा शासनातर्फे करण्यात आला. गावात भीषण पाणीटंचाई असून १२ दिवसानंतर नळांना पाणी येते. गावातील पाणीटंचाई पाहता चार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात टाकून पाणी आणावे लागते. चिमुकली नंदिनीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केल्या.
घटनेच्या दुसया दिवशी शुक्रवारी गावात व मयत नंदिनीच्या घरी शोककळा पसरली होती. घरी सांत्वन करणाºयांची गर्दी होती. 
ऊसतोड मजुराची मुलगी - नंदिनी ही ऊसतोड मजूर नथ्थू पवार यांची मुलगी आहे. नथ्थू पवार हे मुलींचे शिक्षण गावात पूर्ण व्हावे यासाठी नंदिनीसह आपल्या चार मुली व एक मुलाला मोरदड तांडा येथे आपल्या आई वडिलांकडे सोडून ऊसतोड साठी वर्षभर बाहेर जात होते. ते यंदाही १५ दिवसापूर्वीच ऊसतोडीचे काम पूर्ण करुन गावात आले होते. गावात पाणीटंचाई असल्याने नंदिनीही दुपारी पाणी भरण्यासाठी   रेल्वे रुळ ओलांडून गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या४५ फूट खोल खाजगी विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेली.   विहीरीत ८ ते १० फूट पाणी होते. विहीर मातीची असल्याने खाली उतरतांना नंदिनीचा तोल जाऊन  विहीरीत पडली. डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध अवस्थेत पाण्यात बुडाली. दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास नंदिनी परत का आली नाही म्हणून  शोध घेण्यासाठी विहीरीवर गेले असता नंदिनी  पाण्यात बुडल्याचे दिसले. तिला तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याठिकाणी तिला मृत घोषीत करण्यात आल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. दोन टँकर सुरु - गावासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिवसातून पाण्याचे दोन टँकर येतात. पण ते पुरेसे नसल्याने ग्रामपंचायतीने आधीच चार टँकरची मागणी केली आहे. तसेच गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ३७ लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. पण या योजनेस काही शेतकºयांनी विरोध केल्याची माहिती सरपंचांनी दिली.
जंगलातून आणतात पाणी - गावात पाणीटंचाई असल्याने जंगलात  व    नाल्यावरुन ग्रामस्थ पाणी आणतात.

संबधित अधिकाºयावर कारवाईची मागणी
मोरदड तांडा येथील नंदिनी पवार (वय १३) या चिमुकलीचा गुरूवारी दुपारी विहीरीवर पाणी भरतांना पाय घसरल्याने विहरीत पडून मृत्यू झाला़ दुष्काळ निवारणासाठी  शासनाकडून कल्याणकारी योजना राबविल्या जातात़ मात्र प्रशासकीय अधिकाºयांच्या चुकीच्या निर्णयामुळे  नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ मोरदड तांडा गावांसाठी पाच टँकरची गरज असतांना अधिकाºयांनी केवळ दोनच  मंजूर केले़  अधिकाºयांचा हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला आहे़  शासनाकडून मुलीच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत व तिच्या मृत्यूस जबादार  अधिकाºयांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केली़निवेदनावर मनोहर पवार, ज्ञानेश्वर पवार, देवेद्र पाटील, हेमराज गवळी, नवल पवार यांनी दिले आहे.

पुरेसा पाणी नसल्याने प्रशासनाकडे चार टॅकरव्दारे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती़ मात्र २ टॅकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला़ पेयजल योजनेसाठी मंजूरी मिळाली होती़ मात्र गावकºयांनी विरोध केल्याने काम होऊ शकले नाही़          -कनीराम पवार सरपंच, मोरदड तांडा
गुरूवारी पत्तीसह कामाला गेली होती़ गावात पाणीटंचाई असल्याने विहीतुन पाणी भरावे लागते़ पिण्यासाठी पाणी नसल्याने मुलगी पाणी भरण्यासाठी गेली आणि तिचा पाणीटंचाईमुळे बळी गेला़ यापुढे तरी प्रशासनाने प्रयत्न करावे  -ललिता पवार  नंदिनीची आई 

गेल्यावर्षी देखील पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरून पडल्याने ती जखमी झाली होती़ पाण्यासाठी अनेक दुर्दवी घटना गावात वारंवार होतात़ मात्र प्रशासनाकडून पाण्यासाठी ठोस भुमिका घेतली जात नाही़ -दिनेश जाधव ,नागरिक 


 

Web Title: The administration is responsible for the death of a sperm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे