दारू पिऊन वाहनचालक तर्र, कोरोनामुळे कारवाई थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST2021-07-03T04:23:04+5:302021-07-03T04:23:04+5:30

दारूच्या अंमलखाली वाहन चालविणे हा गुन्हा आहे. याची पुरती कल्पना असतानाही अनेकजण मद्यपान करून वाहन चालवित असतात. वाहतूक पोलिसांकडून ...

The action was cooled by the drunken driver Tarr, Corona | दारू पिऊन वाहनचालक तर्र, कोरोनामुळे कारवाई थंडावली

दारू पिऊन वाहनचालक तर्र, कोरोनामुळे कारवाई थंडावली

दारूच्या अंमलखाली वाहन चालविणे हा गुन्हा आहे. याची पुरती कल्पना असतानाही अनेकजण मद्यपान करून वाहन चालवित असतात. वाहतूक पोलिसांकडून मद्यपिवर कारवाईचा बडगा उगारला जातो. २०१९ मध्ये ७०४ तळीरामांवर कारवाई झाली होती तर २०२० मध्ये १०९ जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोनामुळे कारवाईत मोठा खंड पडला आहे. पहिल्यांदा सापडल्यास दंड होतो. अथवा न्यायालयाकडून त्याचा परवाना सहा महिन्यासाठी निलंबित केला जातो.

चौकट

ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद

तळीरामांची तपासणी करण्यासाठी पोलिसांकडून ब्रिथ ॲनालायझरचा वापर होते. पण या यंत्राचा वापर करताना थेट वाहनचालकांशी संपर्क येतो. त्यातून कोणी पाॅझिटिव्ह असेल तर पोलिसांनाही त्याचा धोका आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनच ब्रिथ ॲनालायझरचा वापर तूर्तास बंद करण्यात आला आहे.

चौकट

कोरोना संसर्गाचा धोका पाहता सध्या ब्रिथ ॲनालायझरचा वापर बंद आहे. त्यातून कोणी मद्यप्राशन करून वाहनच चालविताना सापडला तर त्याला शासकीय रुग्णालयात नेऊन चाचणी करण्यात येते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करतो. जिल्ह्यात दारू पिऊन होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी जरी असले तरी पोलीसांच्या लक्षात आल्यावर अशा वाहन चालकांवर तातडीने कारवाई केली जाते.

-संगीता राऊत, वाहतूक शाखा, धुळे

१) मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई

२०१९ २०२० २०२१

जानेवारी १२ ४४ १०

फेब्रुवारी ३४ ३६ ३४

मार्च ५५ २१ ५५

एप्रिल ४० ३१ २१

मे ३३ ९८ ११

जून ७८ २३ ६०

जुलै १२ ९१ १६

ऑगस्ट १२ ८७ १००

सप्टेंबर २२ ११ ६१

ऑक्टोबर ४४ ११ २९

नोव्हेंबर ४६ ३७ २२

डिसेंबर १२ २१ ११

डमी क्र. ८६८

Web Title: The action was cooled by the drunken driver Tarr, Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.