कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST2021-07-11T04:24:51+5:302021-07-11T04:24:51+5:30

जुनी पुस्तके बाजारात धुळे : ऑनलाइन का असेना पण शाळा सुरू झाल्या आहेत. आठवीपासूनचे वर्ग शाळेत सुरू करण्याचे नियोजन ...

Action on | कारवाई सुरू

कारवाई सुरू

जुनी पुस्तके बाजारात

धुळे : ऑनलाइन का असेना पण शाळा सुरू झाल्या आहेत. आठवीपासूनचे वर्ग शाळेत सुरू करण्याचे नियोजन सुरू आहेत. जुनी पुस्तके बाजारात दाखल झाली असून या पुस्तकांना पालकांनी पसंत दिल्याचे दिसत आहे.

नदीपात्रात कचरा

धुळे : प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पांझरा नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. नदीपात्रातील डबक्यांमध्ये प्लॅस्टिकचा कचरा साचलेला आहे. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी पात्राची स्वच्छता केली होती. परंतु पुन्हा कचरा साचल्याची समस्या आहे.

बाजार समितीत चिखल

धुळे : गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गुरांच्या बाजारात पाणी साचून चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

वाहनांचा खोळंबा

धुळे : येथील चाळीसगाव चाैफुलीवर महामार्गावरील वाहनांचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे. किरकोळ अपघातही होत असतात. त्यामुळे महामार्गावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Action on