खोरदडच्या ग्रामसेवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
By देवेंद्र पाठक | Updated: January 21, 2023 05:18 IST2023-01-21T05:17:33+5:302023-01-21T05:18:14+5:30
धुळे तालुक्यातील रतनपुरा येथून काम आटोपल्यानंतर ग्रामसेवक युवराज वाघ हे धुळ्याकडे आपल्या दुचाकीने येत होते.

खोरदडच्या ग्रामसेवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
धुळे : तालुक्यातील खोरदड येथील ग्रामसेवक युवराज वाघ (५५) यांचा गरताड बारीत अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली.
धुळे तालुक्यातील रतनपुरा येथून काम आटोपल्यानंतर ग्रामसेवक युवराज वाघ हे धुळ्याकडे आपल्या दुचाकीने येत होते. चाळीसगाव रोडवरील गरताड बारीजवळ ते येताच समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी वाहतूक विस्कळीत झाली होती.