सोनगीरजवळ अपघात, तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:19 IST2019-10-10T12:19:31+5:302019-10-10T12:19:57+5:30
पहाटेची घटना : सोनगीर ते दोंडाईचा मार्ग

सोनगीरजवळ अपघात, तरुण जागीच ठार
सोनगीर : येथील सोनगीर दोंडाईचा राज्य महामार्गावर गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास समाधान गोरख माळी ( वय २२) या तरुणांच्या अंगावरून अज्ञात वाहन चालून गेले़ त्यात तरुणाचे शरीर अक्षरश: चेपले गेले़ यामुळे यात तरुण जागीच मयत झाला़ अपघाताची माहिती मिळताच सोनगीर टोलची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली़ डॉ़ सचिन बारी, प्रशांत पाटील, जावेद दादा, सुमीत शिंदे यांनी मदतीसाठी धाव घेतली़ तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला़ या प्रकरणी येथील अशोक भिका माळी यांनी सोनगीर पोलिसात खबर दिली आहे़