आरटीओ तडवींची एसीबी नाशिकच्या पथकाकडून पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 17:04 IST2019-07-24T12:42:16+5:302019-07-24T17:04:33+5:30
लाचखोरीचा आरोप : धुळ्यात चर्चेला उधाण

आरटीओ तडवींची एसीबी नाशिकच्या पथकाकडून पडताळणी
धुळे : प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी यांच्यावर लाचखोरीचा आरोप असून त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाकडून पडताळणी सुरु आहे़ यासंदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात परवेज तडवी यांना आणले असून आरोपाची पडताळणी करण्याचे काम मार्गी लावले जात आहे़ या वृत्तामुळे धुळ्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे़