अल्पवयीन काकाचा अत्याचार; १५ वर्षीय पुतणीला झाली मुलगी

By देवेंद्र पाठक | Updated: April 27, 2024 17:40 IST2024-04-27T17:38:10+5:302024-04-27T17:40:19+5:30

हा प्रकार गेल्या ९ ते १० महिन्यांपासून सुरू होता. तिचे पोट दु:खू लागल्याने ही बाब चव्हाट्यावर आली.

Abuse of minor uncle A 15-year-old nephew has a daughter | अल्पवयीन काकाचा अत्याचार; १५ वर्षीय पुतणीला झाली मुलगी

अल्पवयीन काकाचा अत्याचार; १५ वर्षीय पुतणीला झाली मुलगी

धुळे : अल्पवयीन काकाने आपल्या १५ वर्षीय पुतणीवर अत्याचार करून तिला पोटुशी केले. यात पीडितेने एका मुलीला जन्म दिला. हा प्रकार साक्री तालुक्यातील एका गावात गुरुवारी घडल्याने गावात खळबळ उडाली. गंभीर बाब म्हणजे पीडिता आणि अत्याचार करणारा बालक हे दोघेही अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, विधिसंघर्षित बालकाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. साक्री तालुक्यातील एका गावातील एका वस्तीत राहणाऱ्या १५ वर्षीय बालिकेशी तिच्या चुलत काकाने संबंध ठेवले. हा प्रकार गेल्या ९ ते १० महिन्यांपासून सुरू होता. तिचे पोट दु:खू लागल्याने ही बाब चव्हाट्यावर आली. तिला तातडीने धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी अल्पवयीन मुलीने गुरुवारी एका मुलीला जन्म दिला.

पीडिता हा अल्पवयीन असल्याने पीडितेशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या अल्पवयीन काकाविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३७६ (३), ३७६ (२), (एन) (एफ) सह बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ४, ५, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा विधिसंघर्षित बालक असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
 

Web Title: Abuse of minor uncle A 15-year-old nephew has a daughter