आश्रम शाळेतील दोघ अल्पवयीन मुलांचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Updated: October 18, 2023 16:01 IST2023-10-18T16:00:48+5:302023-10-18T16:01:02+5:30
याप्रकरणी आश्रम शाळेचे अधीक्षक दिलीप भानुदास पावरा (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आश्रम शाळेतील दोघ अल्पवयीन मुलांचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
धुळे : साक्री तालुक्यातील वरसूस येथील आश्रम शाळेतून दोघा अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी सकाळी ६:३० ते ७:३० या दरम्यान घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध मंगळवारी रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
साक्री तालुक्यातील वरसूस यथे अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा आहे. या आश्रम शाळेत इयत्ता तिसरी व इयत्ता चौथीत शिकत असलेल्या दोघा अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून आश्रम शाळेच्या परिसरातून पळवून नेले. याप्रकरणी आश्रम शाळेचे अधीक्षक दिलीप भानुदास पावरा (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक एच. एल. गायकवाड यांनी भेट दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहेत.