चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले; देवपुरातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा

By देवेंद्र पाठक | Updated: June 23, 2023 16:51 IST2023-06-23T16:50:04+5:302023-06-23T16:51:22+5:30

तन्मय गणेश अवसारे (रा. प्लॉट नंबर ३, प्रभात नगर, देवपूर) या तरुणाने फिर्याद दाखल केली.

A young man was robbed at knifepoint; Incident in Devpur, crime against three persons | चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले; देवपुरातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा

चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले; देवपुरातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा

धुळे : देवपूर परिसरातील व्यंकटेश कॅफे जवळून दाळवाला हाॅस्टेलकडे जाणाऱ्या एका तरुणास तीन जणांनी चाकुचा धाक दाखवून लूट केली. त्यात साडेतीन हजाराची रोकड आणि ७ हजाराचा मोबाईल असा ऐवज घेऊन पोबारा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

तन्मय गणेश अवसारे (रा. प्लॉट नंबर ३, प्रभात नगर, देवपूर) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तन्मय हा देवपुर परिसरातील व्यंकटेश कॅफेजवळून दाळवाला हॉस्टेलकडे जात होता. कोणीही नसल्याची संधी साधून तीन जणांनी त्याला रस्त्यात अडविले. शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशातून ३ हजार ५०० रुपयांची रोकड आणि ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला.

मारहाण करत त्याला हाकलून देत तिघांनी पोबारा केला. यावेळी आरडा ओरड करण्यात आला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात भादंवि कलम ३९४, ४४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजेश इंदवे करीत आहेत.

Web Title: A young man was robbed at knifepoint; Incident in Devpur, crime against three persons